नागभीड : अखिल भारतीय कुणबी समाज संघटना, तालुका नागभीड यांच्या वतीने अखिल कुणबी समाज बांधवांचा स्नेहमिलन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व समाजातील गुणीजणांचा सत्कार समारंभ उद्या शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता रुख्मिणी सभागृह, नागभीड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पंजाबरावजी गांवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगांबर गुरपुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष रडके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड तसेच हरिभाऊ गरफडे, माजी प्राचार्य कर्मवीर विद्यालय, नागभीड उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गजानन पाथोडे, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर, प्रा. रेखा जगनाडे, माजी सभापती पंचायत समिती, नागभीड, मारोतराव जुनघरे, माजी प्राचार्य जनता विद्यालय, नागभीड, सुधाकर राऊत, अध्यक्ष अखिल भारतीय कुणबी समाज पुरुष बचत गट, नागभीड, गौरव गोविंदराव भंडारकर, संचालक रुख्मिणी लॉन/सभागृह, नागभीड तसेच गिरीष नवघडे, सामाजिक कार्यकर्ते, नवेगाव पांडव उपस्थित राहणार आहेत.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अखिल भारतीय कुणबी समाज संघटना, तालुका नागभीड यांनी केले आहे.