सह्याद्री क्रीडा मंडळ चितेगाव यांच्या वतीने एकदिवसीय भव्य कबड्डी सामने संपन्न
मुल : सह्याद्री क्रीडा मंडळ चितेगाव यांच्या माध्यमातून दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संदीप कारमवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद रंदये होते.

या कबड्डी महोत्सवात परिसरातील ४६ संघांनी सहभाग घेतला. विजयी संघांना बक्षीस वितरण समारंभ संदीप कारमवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर मिलिंद रंदये, पत्रूजी दांडेवार, तुकाराम रंदये, अरुण मेश्राम, साहिल येनगंटीवार आणि पुंडलिक रंदये उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमित मिसार यांच्यासह कुणाल लांजेवार, ओमेश नन्नावरे, दर्शन हजारे, गौरव पोवनवार, आशिष जांभुरे, वैभव गोहणे, गोलू मिसार, रितेश देशमुख, ओम रणदिवे, मयूर रणदिवे, अंश गोहणे, पियुष वाघरे, विघ्नेश वाघमारे, प्रेम याटकर्लेवर, भूपेश मडावी, क्रिश कुंभरे, हर्षल रणदिवे तसेच इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
