Top News

सावित्रीमाई जयंतीला नवेगाव हुंडेश्वरीत ‘लक्षवेध अभ्यासिका’ उभारणीचा संकल्प

सावित्रीमाई जयंतीला नवेगाव हुंडेश्वरीत ‘लक्षवेध अभ्यासिका’ उभारणीचा संकल्प


नागभीडजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथे थोर समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात ‘लक्षवेध अभ्यासिका’ सुरू करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू जांभुळे, सरपंच कल्लू नेवारे, पोलीस पाटील शारदा चौधरी, रमेश ठाकरे, धनराज ढोक, मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, नरेंद्र वासनिक, संजय येरणे, शिक्षण प्रेरक मेघा गुरनुले, नंदिनी नान्हे,  सत्यभामाबाई नंदपूरकर (अंगणवाडी सेविका) यांच्यासह विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी संघ व माळी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासात प्रथमच इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी गंगा गुरनुले हिला अध्यक्षस्थान देण्यात आले, याबद्दल उपस्थितांनी विशेष समाधान व्यक्त केले.जयंतीनिमित्त गावात ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच प्रभात फेरी काढून शिक्षण व सामाजिक प्रबोधन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघ, नवेगाव हुंडेश्वरी यांच्या वतीने ‘लक्षवेध अभ्यासिका’ सुरू करण्याचा मानस जाहीर करण्यात आला. यासाठी माजी जि. प. सदस्य संजयभाऊ गजपुरे यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.प्रतिक चौधरी, विशाल पांडव, योगेश चौधरी, गणेश सोनुले, नितीन बागडे, पराग गुरनुले, सचिन सोनुले यांनी एकत्र येऊन अभ्यासिकेमार्फत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देत गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा विडा उचलला आहे.आगामी काळात शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन व संपूर्ण शालेय रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे.कार्यक्रमात सावित्रीमाई फुले व जिजाऊसाहेब यांची वेशभूषा, देशभक्तीपर गीतगायन, बँड-लेझीम पथक, प्रभावी सूत्रसंचालन आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये शिक्षणविषयक जनजागृती करण्यात आली.

Previous Post Next Post