Top News

युवा नगरसेवक मोहीत डंगोरे यांचा स्वच्छतेसाठी आक्रमक पवित्रा

 युवा नगरसेवक मोहीत डंगोरे यांचा स्वच्छतेसाठी आक्रमक पवित्रा



बल्लारपूर | नगर परिषदेत नवी सत्ता स्थापन झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी युवा नगरसेवक मोहीत आनंद डंगोरे यांनी पहिलं लेखी निवेदन देत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडली आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये मागील आठ दिवसांपासून बंद असलेल्या घंटागाडी सेवेबाबत त्यांनी नगराध्यक्षा डॉ. अल्का वाडई यांचे तातडीने लक्ष वेधले.

कन्नमवार वार्ड व डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड परिसरात घंटागाडी सेवा ठप्प असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरगुती कचरा साचल्याने अस्वच्छता वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मोहीत डंगोरे यांनी दिलेल्या निवेदनात घंटागाडी सेवा तात्काळ सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे. स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य हीच माझी सर्वोच्च प्राथमिकता असून या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

सत्ता स्थापन होताच दुसऱ्याच दिवशी जनहिताच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या युवा नगरसेवकाच्या या कृतीचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून नगर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Previous Post Next Post