Top News

जनता शिक्षण संस्था जपतेय गणेशोत्सवाची अखंड परंपरा

जनता शिक्षण संस्था जपतेय गणेशोत्सवाची अखंड परंपरा


नागभीड येथील जनता शिक्षण संस्थेने गणेशोत्सवाची अखंड परंपरा जोपासलेली आहे. 



 नागभीड :   स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागभीड व परिसरातील समाजसेवी, शिक्षण प्रेमी, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक यांनी एकत्रित येऊन जनता शिक्षण संस्थेची निर्मिती केली व या संस्थेच्या माध्यमातून नागभीड नगरीत जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय या दोन ज्ञानमंदिरांची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासूनच विद्यापती गणरायाचं गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो.  या वर्षी या शिक्षण संस्थेने ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे व संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची  सुरुवात झालेली आहे. गणरायाच्या आशिर्वादाने आज पर्यंत या शिक्षण संस्थेने अनेक प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स ,इंजिनियर्स, प्राध्यापक, शिक्षक व  योग्य नागरिक घडविलेले आहेत.

 यावर्षी सुद्धा गणेश चतुर्थी च्या दिवशी संस्थाध्यक्ष  डॉ. अमीर धमानी यांनी सपत्नीक विधीवत पूजा करून गणेशाची स्थापना केली.

 दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात संस्था संचालित तिन्ही विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवादरम्यान भजनांचा कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे भजन संध्या, सुगम संगीत कश्याप्रकारे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सदर उत्सव आनंदाने व उत्साहाने पार पडावा याकरिता कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवली जाते. यात सजावट, रोशनाई, विधीवत पूजा व आरती, कार्यक्रम आखनी, भजन, स्नेहभोजन, काला , व विसर्जन कश्याप्रकारे जबाबदारी दिली जाते व सर्व कर्मचारी उत्साहाने आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतात. 

गणेशोत्सवाचे यशस्वीते करिता जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  डॉ.अमीर धमानी, सचिव डॉ.रवींद्र कावळे, उपाध्यक्ष अतुल चिल्लूरे, चक्रधर रोहणकर, सहसचिव रवींद्र समर्थ, कोषाध्यक्षा मनीषा चव्हाण , संस्था सदस्य गुलजार धमानी,ॲड.गोविंदराव भेंडारकर, लैला धमानी, प्राचार्य एस.टी. कोरे, प्राचार्य एस. डी. जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. 

गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याकरिता जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व एमसीव्हीसी विभाग, जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व जनता काॅन्व्हेट स्कूल चे सर्व कर्मचारी मेहनत घेतात.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी काला केला जातो, त्यानंतर विधिवत पूजा करून नागभीड नगरीतून बँड पथका सहित मिरवणूक काढण्यात येते व श्री गणेशाला मनोभावे निरोप दिला जातो.

Previous Post Next Post