यादवराव पोशट्टीवार महाविद्यालयात ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
नागभीड ( तळोधी बा.) प्रतिनिधी : नागभीड तालुक्यातील तळोधी येथील यादवराव पोशट्टीवार महाविद्यालयात नुकत्याच पर पडलेल्या संस्थापक श्री. वसंतराव उर्फ नानासाहेब पोशट्टीवार यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्ताने विशेष उपक्रम राबविण्यात आला. या औचित्याने नानासाहेब फाउंडेशन तर्फे महाविद्यालयातील ५५ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नानासाहेब पोशट्टीवार होते. यावेळी आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप पोशट्टीवार, कोषाध्यक्ष नानासाहेब पोशट्टीवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. अरुणप्रकाश, प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाला भाजपा चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी बांधमांक सभापती न. प. नागभीड चे सचिन आकुलवार, भाजपा तळोधी मंडळ अध्यक्ष हेमंत लांजेवार, नरेंद्र खोब्रागडे, दिवेश सयाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश घिये सह नागभीड तालुका भाजपा पदाधिकारी, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्याने शिक्षणासाठी ये-जा करण्याचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे समाधान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
संपादकीय टीप
मागील अंकात प्रकाशित झालेल्या बातमीत चुकून “स्वर्गीय” आणि “जयंती” हे शब्द वापरले गेले होते. प्रत्यक्षात कार्यक्रम हा संस्थापक श्री. वसंतराव उर्फ नानासाहेब पोशट्टीवार यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या त्रुटीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.