राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश


मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रम



चंद्रपूर / राजुरा | गौतम कांबळे (उपसंपादक) :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच सर्व राजकीय पक्षांनी ग्रामीण भागात बैठकांद्वारे व कार्यक्रमांद्वारे जनाधार वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने सुद्धा ग्रामीण पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी आपला मोर्चा वळविला आहे.

याच अनुषंगाने सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे हनुमान मंदिर परिसरातील खुल्या मैदानात भव्य प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात शेकडो युवकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. यावेळी गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी पोलीस पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाला मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे आदी मान्यवर उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी नव्या महाराष्ट्र सैनिकांचे स्वागत करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा व भद्रावती या भागात मनसेचा वाढता प्रभाव लक्षात घेता, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनसे उमेदवार दिल्यास पक्षाचे खाते उघडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. गोयेगाव येथे झालेल्या शेकडो युवकांच्या प्रवेशामुळे राजुरा तालुक्यातील मनसे संघटनाला नवे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.