Top News

अमली पदार्थ (MD drugs) विक्रीचे डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळले....₹1.74 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ (MD Drugs) विक्रीचे डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळले....₹1.74 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त




चंद्रपूर : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेफेड्रोन (MD drugs) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून एकूण 4.450 ग्रॅम मेफेड्रोन पावडर, एक धारदार चाकू व दोन वाहने असा एकूण ₹1,74,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने 16 ऑगस्ट 2025 रोजी केली. अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात चंद्रपूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्वाचे मानले जात असून, शहरात ड्रग्जच्या विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. या प्रकरणी पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.

Previous Post Next Post