Dry-Day ला मुल पोलिसांची धडक कारवाई – देशी व विदेशी दारूसह आरोपी जेरबंद

Dry-Day ला मुल पोलिसांची धडक कारवाई – देशी व विदेशी दारूसह आरोपी जेरबंद


₹38,710 किमतीचा मुद्देमाल जप्त – मुल पोलिस ठाण्याची कारवाई


मुल : स्वातंत्र्यदिनानिमित्त 16 ऑगस्ट रोजी ‘Dry-Day’ घोषित असतानाही दारू विक्रीचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात मुल पोलिस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई केली.

या कारवाईत देशी व विदेशी कंपन्यांच्या दारूसह एकूण ₹38,710 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी गुप्तपणे दारूची विक्री सुरू असल्याची खबर मिळताच  सापळा रचून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये देशी-विदेशी कंपन्यांच्या बाटल्यांचा समावेश आहे.

या यशस्वी कारवाईमुळे ड्राय-डेच्या दिवशी दारू विक्रीस आळा बसला असून, पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.