Top News

बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई

बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई : बलीनो कारमधून अवैध देशी-विदेशी दारू जप्त, ६ लाख १४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 




बल्लारपूर | गौतम कांबळे | उपसंपादक - बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह एकूण ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१६ ऑगस्ट रोजी डायल ११२ वाहनावरील मार्शल पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे बामणी टी-पॉईंट, कोठारी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान पांढऱ्या रंगाची बलीनो कार (क्र. एम.एच. ३४-सीजे-२४७७) संशयास्पदरीत्या येताना दिसली. वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतूक होत असल्याचे आढळले.

तपासात रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारू – २५ पेट्या, किंमत १ लाख रुपयेऑफिसर चॉईस विदेशी दारू – २ पेट्या, किंमत १४ हजार रुपये असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा माल आढळून आला. यासोबतच सदर बलीनो कार किंमत ५ लाख रुपये जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या कारवाईत वाहनचालक सुदर्शन शंकर दासारी (३८, रा. गडचांदुर) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोहवा परमीवीर यादव, पोअं सौरभ मुन व इतर कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post