Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधातील अपशब्द निंदनीय – हरीश शर्मा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भाजपा (ग्रा.)

पंतप्रधान नरेंद्र  मोदी विरोधातील अपशब्द निंदनीय –  हरीश शर्मा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भाजपा (ग्रा.)


काँग्रेस व सहयोगी पक्षांच्या मोर्चात पंतप्रधानांविरोधात अपशब्द – भाजपाचा संताप, पोलिसांकडे तक्रार




चंद्रपूर  : 14 ऑगस्ट 2025 रोजी चंद्रपुरात काँग्रेस व त्याच्या सहयोगी पक्षांनी मोर्चा काढला होता. सरकार व निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा होता. देशातील प्रत्येकाला सरकार विरोधात बोलण्याचा व शांततामय निदर्शने करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसारच हा मोर्चा काढण्यात आलेला असावा. 

परंतु या मोर्चात उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अपशब्द काढले. जे अतिशय निंदनीय आहे. देशाच्या पंतप्रधानांबद्दल काढलेल्या या अप शब्दांचा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे भाजपच्या एका शिष्टमंडळाद्वारा एक रीतसर तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी ही तक्रार स्वीकारून यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले

या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राहुल पावडे,डॉक्टर मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, रामपाल सिंग, किरण बुटले, नम्रता  ठेमस्कर , श्रीनिवास जंगम, विशाल निंबाळकर, सचिन कोतपल्लीवार, पुरुषोत्तम सहारे, चांद सय्यद, गौतम निमगडे, काशिनाथ सिंह, समीर केणे, हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, शांताराम चौखे, सरस्वती दास, मीनाक्षी उपगंलावार , मोनीश् आस्वानी, भोजराज शिंदे, दीपक मडावी, अरविंद बोरकर, गोणी जसपाल इंदर सिंग, आकाश खत्री उपस्थित होते.

Previous Post Next Post