Top News

ठाकरे यांचे नेतृत्व मान्यकरीत समर्थकांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश; कार्यकर्ता मेळाव्याने भरला उत्साह व जोश

ठाकरे   यांचे नेतृत्व मान्यकरीत     समर्थकांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश; कार्यकर्ता मेळाव्याने भरला उत्साह व जोश




कोरपना | रोशन आस्वले | तालुका प्रतिनिधी : कोरपना तालुका काँग्रेस व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्याने उत्साहाचा झंकार निर्माण केला. काँग्रेसच्या झेंड्याखाली भरलेला हा मेळावा कार्यकर्त्यांच्या जयघोषांनी दुमदुमून गेला.

यावेळी कामगार नेते सुरज ठाकरे यांचे समर्थक नारंडाचे आशिष कुचनकर, गडचांदूरचे मिलींद सोनटक्के, जिवतीचे गणेश सुरनर, सोनुर्लीचे शंकर वाढई, आशिष बावणे यांच्यासह जवळपास २०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद अधिक वाढली असल्याचे नेत्यांनी नमूद केले. प्रवेशकर्त्यांनी काँग्रेस विचारसरणीवरील विश्वास अधोरेखित करत पक्षाच्या झेंड्याखाली कार्य करण्याची शपथ घेतली.

मेळाव्यातील भाषणातून नेत्यांनी भाजप सरकारच्या कारस्थानांवर गंभीर टीका केली. विशेषतः खा. राहुल गांधी यांनी उघड केलेल्या “भाजपच्या मतचोरी” व “बिहारमध्ये तब्बल ३५ लाख मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकारावर” चर्चा करत स्थानिक कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर “मतांची चोरीविरोधी सह्या मोहीम” राबविण्यात आली, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मेळाव्यास खासदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी नगराध्यक्षा सविता टेकाम, गडचांदूर शहराध्यक्ष संतोष महाडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच नोगराज मंगरूळकर, विठ्ठलराव थिपे, संभाजी कोवे, रऊफ खान, कृषी उपबाजार समिती सभापती अशोकराव बावणे, सुरेश मालेकर, गणेश गोडे, प्रा. आशिष देरकर, सचिन भोयर, शैलेश लोखंडे, विक्रम येरणे, प्रा. हेमचंद दुधगवली, एकनाथ गोखरे, महादेव हेपट, जयश्री ताकसांडे, अहमद भाई, बंडू चौधरी, नानाजी आदे, अभय मुनोत, सुनील झाडे, उमेश राजूरकर, किरण ऐकरे, मुर्लीधर बल्की, दिपक खेकारे, भाऊजी चव्हाण, आशिष वांढरे, हारून सिद्धिकी, प्रितम सातपुते यांसारख्या नेत्यांनीही मेळाव्याला उपस्थिती लावली.

मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या हजेरीमुळे हा मेळावा ऐतिहासिक व ऊर्जावान ठरला. विशेष म्हणजे सुरज ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रवेश हा मेळाव्याचा मुख्य आकर्षण ठरला.

Previous Post Next Post