Top News

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक

📰 निधन वार्ता

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक


मातोश्री कमलबाई वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन




नागपूर : राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. 

त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, नातवंडे, सुना, जावई व मोठा आप्तपरिवार आहे. कमलाबाई निवास प्लॉट नंबर 5 6 हॉटेल तुली इम्पेरिअलच्या मागे, रामदास पेठ येथील नीवास्थानाहुन मंगळवारी दुपारी ३:०० वाजता अंत्ययात्रा निघून मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

कमलबाई वडेट्टीवार यांच्या निधनाने वडेट्टीवार कुटुंबियांसह समाजातील विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमलबाई वडेट्टीवार यांच्या जाण्याने वडेट्टीवार कुटुंबासह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी पोकळी निर्माण झाली आहे


👉 विदर्भ माझा न्यूज 24 तर्फे कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. 🙏🏻

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌹

Previous Post Next Post