Top News

मनसे जिल्हा संघटनेला नवसंजीवनी - अमन अंधेवारांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरात कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसे जिल्हा संघटनेला नवसंजीवनी  -   अमन अंधेवारांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरात कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश 


चंद्रपूर | गौतम कांबळे |उपसंपादक -  जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यात नवचैतन्य निर्माण करणारा भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा काल साक्षीला आला. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि जनतेच्या मनाला भिडणाऱ्या राजकारणावर, तसेच मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती नेतृत्वावर व तडफदार कार्यशैलीवर विश्वास ठेवून तब्बल २४ कार्यकर्त्यांनी मनसेच्या ध्वजाखाली प्रवेश केला.

अंधेवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयात उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विविध समाजघटक, व्यावसायिक, तरुण नेते, ग्रामीण भागातील प्रभावी व्यक्तींचा समावेश होता.

प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांची नावे — प्रशांत जुलमे, विनोद गुप्ता, नाविन कोतले, करण चेतूलवार, संतोष सोयाम, सुधीर झाडे, गणेश सोनेकर, गणेश गोखरे, राकेश सल्लम, नितेश खनके, मयूर पावडे, नयन पेदोर, गौरव येकलवार, अशोक कातकर, श्रावण गडपल्ली, अरविंद पेंदाने, सुरज केवळ, राधाकृष्ण भोंगा, रोशन चव्हाण, संपूरणणंद चव्हाण, अभिजीत पांडे, अरविंद चंदनखेडे, ओम बावणे आणि राकेश गाडी.

या सर्वांनी मनसेच्या विचारधारेवर पूर्ण निष्ठा ठेवत, जिल्हा पातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद वाढणार असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर ठोस परिणाम होणार आहे.

अमन अंधेवार यांचे भाष्य
"मनसे म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि स्थानिकांचा हक्क मिळवून देणारी संघटना आहे. आज सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आमची ताकद अनेकपटीने वाढली आहे. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि समाजघटकात मनसेचे अस्तित्व निर्माण करू," असे अंधेवार यांनी स्पष्ट केले.

पक्ष प्रवेश सोहळ्यात रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, उद्योगात स्थानिकांचा सहभाग, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध लढा या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.

हा प्रवेश केवळ संख्यात्मक वाढ नसून तळागाळातील लोकांचा विश्वास जिंकणारा निर्णायक टप्पा ठरला आहे. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून स्थानिक राजकारणात बदलाची चाहूल लागल्याची भावना निर्माण झाली आहे. मनसेच्या या झंझावाती प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांची बीजे रोवली गेली असून, येत्या निवडणुकांमध्ये त्याचा ठसा उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post Next Post