राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...
नागभीड : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात ’79 वा स्वातत्र्यं दिन’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने संस्थेचे सदस्य मयुर वनमाळी यांचे शुभहस्ते ‘ध्वजारोहण कार्यक्रम’ पार पडला. या प्रसंगी सस्थेचे कोषाध्यक्ष हरिश्चंद्र बोंदरे, संस्थेचे सदस्य धनंजय वनमाळी, संस्थेचे सदस्य प्रकाश भोयर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख हे उपस्थित होते. तर देवेंद्र राहूड, शाम पाथोडे, राजेश झाल्लरवार अक्षय वनमाळी यांची विषेश उपस्थिती लाभली.
दि. १३ व १४ ऑगस्टला स्वातंन्न्याच्या अमृत महोत्सव निमीत्य व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत जन जागृती रॅली काढण्यात आली.
ध्वजारोहणनंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी झेंडागीत सादर केला. उपरोक्त कार्यक्रमाचे औचित्य साधून अवयव दान या पंधरवाड्यात काढण्यात आलेली रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रचल ढोक यांनी केले तर परेड व्यवस्था प्रा. किशोर बोरकर यांनी पार पाडली.
या प्रसंगी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
