Top News

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते गडचिरोलीत रानभाजी महोत्सवाचे उदघाट्न

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते गडचिरोलीत रानभाजी महोत्सवाचे उदघाट्न


जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाजी महोत्सवात भेट देऊन रानभाजी चे महत्व समजून घेण्याचे खासदार डॉ. किरसान यांचे आवाहन




गडचिरोली: 14 ऑगस्ट 2025 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), च्या वतीने गडचिरोलीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते संपन्न झाले.

या महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, सिरोंचा सारख्या अतिदुर्गम भागांतील व संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधव-भगिनींनी रानावनातील विविध प्रकारच्या भाज्या, तसेच महुआ, फुलांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ प्रदर्शनात मांडले. 

खासदार डॉ. किरसान यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

 रानभाजी मध्ये असलेले औषधी गुण व त्यांचे विशेष महत्त्व लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी या रानभाजी महोत्सवात उपस्थित राहून रानभाजीचे महत्त्व समजून घ्यावे व दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा असे आवाहन खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी केले.

याप्रसंगी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग प्रीती हरिळकर, डॉ. किशोर झाडें, शहर अध्यक्ष सतीश विधाते,  जिल्हाध्यक्ष किसान विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, तनुश्रीताई आत्राम, शेतकरी, कृषी तज्ञ  अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post