सावळी सदोबा दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र अंतर्गत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन
सावळी सदोबा (ता. प्र.) :- आर्णी तालुक्यातील दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र सावळी सदोबा अंतर्गत येत असलेल्या अंजनखेड वर्तुळक्षेत्रातील तथा विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरअसलेल्या कवठा (बाजार) या गावामध्ये 1ऑक्टोबर ते 7ऑक्टोबर असणाऱ्या वन्यजीव सप्ताह निमीत्त महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथे वन विभागाकडून वन्यजीव सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, महात्मा गांधी यांच्या विचाराने खरा भारत हा ग्रामीण भागातच नांदतो, ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे,जयंती निमित्ताने गांधीजींचे विचार तळागाळातील सर्व घटकापर्यंत पोहोचवावे तेव्हाच गांधीजींची खरी जयंती साजरी होईल,अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले, तसेच स्वच्छता अभियान राबविले.वन्य जीव सप्ताहाचा उद्देश जंगलातील वन्यजीवांचे संरक्षण,त्यांचे महत्त्व,आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन या विषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.या सत्रांमध्ये वन्यजीवांचे जीवन,त्यांचे पर्यावरणातील स्थान, आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे परिणाम या विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.या व्यतिरिक्त,वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने या कार्यक्रमात वन्यजीव तज्ञांनी जंगलातील जैवविविधतेचे महत्त्व आणि वन्यजीव संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. जंगलातील वन्य प्राण्यांचे अस्तित्व समृद्धीचे लक्षण आहे,जंगल समृद्ध आहे हे त्या जंगलातील वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे ओळखल्या जातात, त्यामुळे जंगलाचे वैभव जतन करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आणि नैतिकता आहे.असे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले, सदर कार्यक्रमाचे आयोजन उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनात दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र अधिकारी चंदू गावंडे, अंजनखेड वनपाल अनंत कोरडे ,सावळी वनपाल मनोज घोडमारे, बेलोरा वनपाल सचिन धुर्वे, वनरक्षक शंकर नाटकर, वनरक्षक प्रसाद मंजलवाड सह वन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
