Top News

राजुरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६७ वा वर्धापन दिन समारोह उत्साहात संपन्न

राजुरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६७ वा वर्धापन दिन समारोह उत्साहात संपन्न



चंद्रपूर/राजुरा |उपजिल्हा प्रतिनिधी | मनोज श्रीहरी गोरे :: ३ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुपर मार्केट हॉल, आसिफाबाद रोड, राजुरा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तालुका राजुरा च्या वतीने ६७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो भीम सैनिकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हा आंबेडकरी चळवळीतील एकतेचा मोठा आविष्कार ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात भीमशाहीर संभाजी ढगे यांच्या आंबेडकरी जलश्याने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. प्रमुख पाहुणे नेताजी बुरचुंडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर सिद्धार्थ पथाडे यांनी अध्यक्षीय भूमिका सांभाळली.

विशेष अतिथी म्हणून डॉ. ऍड. सत्यपाल कातकर, भारत थुलकर, जि. के. उपरे,पवन भगत, हरीश दुर्योधन,अंकुश वाघमारे,निवारण कांबळे, राजू भगत आणि अन्य ज्येष्ट मान्यवर उपस्थित होते. वक्त्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकत, पक्षाला गळती कशी लागली आणि त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी काय करता येईल यावर आपले विचार मांडले.

डॉ. ऍड. सत्यपाल कातकर यांनी आपल्या प्रभावी आक्रमक भाषणात सरकार आणि दलालांवर जोरदार हल्ला चढवला आणि समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात सिद्धार्थ पथाडे यांनी यानंतर कुठल्याच गटा तटात न राहता मरेपर्यंत आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित करण्याचे जाहीर केले.

या सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला त्यात नेताजी बुरचुंडे (माजरी), डॉ.ऍड.सत्यपाल कातकर (राजुरा),भारत थुलकर (बल्लारपूर),जि. के. उपरे (बल्लारपूर),पवन भगत (बल्लारपूर), हरीष दुर्योधन (भद्रावती), अंकुश वाघमारे (चंद्रपूर), निवारण कांबळे (बामणवाडा),किशोर रायपूरे (राजुरा), प्रल्हाद नगराळे (कविटपेठ), चरणदास रत्नपारखी (सोंडो),चरणदास मडावी (पंचाळा),प्रभाकर दुर्योधन (डोंगरगांव),पौर्णीमा ब्राम्हणे (राजुरा),डॉ. विश्वास (विरूर), शामसुंदर मेश्राम (राजुरा),व्यंकटराव चव्हाण (डोंगरगांव),मारोती रामटेके (धानोरा). कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला, ज्यातून आंबेडकरी चळवळ एक नवीन दिशा घेईल, असे दिसून आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर देवगडे, प्रणित झाडे, अमोल राऊत, सिद्धार्थ रणवीर, धनराज उमरे, ऋषी रायपूरे, महेंद्र साखरकर, प्रदीप उपरे,रामदास दुर्योधन, सुभाष बोर्डे, दादा जावडेकर,मधुकर जावडेकर,गीता पथाडे, कांचन बार्शिंगे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा राजुरा, नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था राजुरा आणि विविध सामाजिक संघटनांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous Post Next Post