Top News

आमदार बंटी भांगडीया यांची जावळ समारंभानिमित्त गुंडेवार यांच्या घरी ‌स्वदिच्छ भेट....

आमदार बंटी भांगडीया यांची जावळ समारंभानिमित्त गुंडेवार यांच्या घरी ‌स्वदिच्छ भेट....



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

दि. ४ फेब्रुवारी/ आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी नागभीड नगर परिषद क्षेत्रातील नवखळा येथे सुरेश गुंडेवार व रीता गुंडेवार यांची नात, पराग गुंडेवार आणि ऐश्वर्या गुंडेवार यांची सुकन्या कु. श्रीनिका हिच्या जावळ समारंभानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.  


 याप्रसंगी गुंडेवार कुटुंबियांशी वार्तालाप करून मंगलमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समस्त गुंडेवार परिवाराच्या वतीने आमदार बंटीभांगडीया यांचे आगमनाप्रसंगी औक्षण करत स्वागत केले आणि शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी समस्त गुंडेवार परिवार, ताटेवार परीवार, लगडेवार परिवार, मंगला बत्तुलवार, लक्ष्मी बत्तुलवार, मोरे परीवार,कु. पुर्वा बत्तुलवार तसेच, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण,


माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा नेते रमेश ठाकरे, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, भाजयुमो शहराध्यक्ष हेमंत नन्नावरे, शुभम चिल्लूरे, शुभम येरणे, दिलीप चौधरी, रवींद्र देवारे, अरुण कापरे, संजय माथनकर, दिवाकर चौधरी, यशवंत ठाकरे, दुर्योधन देवारे, जगदीश दडमल, चिंतामण दडमल, सुनील सातपैसे, संदीप समर्थ, रामा ठाकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post