Top News

नागभीड येथे गाव चलो अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांची कार्यशाळा संपन्न....

नागभीड येथे गाव चलो अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांची कार्यशाळा संपन्न....



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

 देशातील सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात देश विकासकार्यात प्रगतीपथावर नेत आहेत.आणि हे विकासकार्य असेच अविरत राहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे  व जिल्हाध्यक्ष हरीश  शर्मा यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नागभीड येथे चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सर्व  पदाधिकारी व कार्यकर्ते,जेष्ठ नेते यांची कार्यशाळा टिचर सोसायटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली.


बैठकीमध्ये गाव चलो अभियानांतर्गत प्रत्येक बूथ वर एका प्रमुख कार्यकर्त्याला प्रवासी कार्यकर्ता म्हणून मुक्कामी राहून बूथ वरील कामांचाआढावा घेणे, समस्यांची माहिती,संघटनेबाबत चर्चा संवाद, शासनाच्या योजनांची माहिती देणे,आजी माजी पदाधिकाऱ्याच्या भेटी घेणे बाबत सर्व माहिती सविस्तर पणे प्रमुख मार्गदर्शन जिल्ह्याचे संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी कार्यकर्त्यांना दिले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष संतोष रडके यांनी केले.तर संचालन तालुका महामंत्री जगदीश सडमाके यांनी केले.

यावेळी मंचावर जेष्ठ नेते मोरेश्वर ठीकरे,माजी सभापती विलास दोनोडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रमेश बोरकर,

जिल्हा उपाध्यक्ष आनंद कोरे,माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार,महिला आघाडी अध्यक्षा इंदु आंबोरकर,माजी तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, जि.प.प्रमुख अरविंद भुते, जि.प.प्रमुख धनराज बावनकर, जि.प.प्रमुख राजेश घिये,जहांगीर कुरेशी,रमेश ठाकरे तसेच  कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व मुख्य पदाधिकारी,बूथ प्रमुख,जेष्ट नेते,महिला आघाडी सदस्य व अन्य कार्यकर्ते उपस्थिती होते.

Previous Post Next Post