श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान
जनजागृती करून नागरीकांना कापडी पिशव्या वाटप करीत दिला सामाजिक संदेश
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
आज दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जन्म दिनाच्या औचित्यनाने युवा दिन सप्ताह साजरा करण्यात येतो यानिमित्ताने श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर संचालित इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशाने लोणारा,ता.भद्रावती येथे प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.
यावेळी विभागातील विद्यार्थ्यांनी गावांमध्ये फिरून नागरीकांना प्लास्टिक वापरापासून होणारे जनसामान्यांना दुष्परिणाम, प्लास्टिक वापरामुळे प्राणीमात्रांची होणारी जिवितहानी, प्लास्टिक वापर निसर्गाचा कसा समतोल बिघडतो याबद्दल जनजागृती करण्यात आले सोबतचं विद्यार्थ्यांनी नागरीकांना कापडी पिशवी वाटप करून प्लास्टिक च्या पिशव्या न वापरण्यासाठी मार्गदर्शन करीत जनजागृती करून सामाजिक संदेश दिला.
या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक ॲंड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने विभाग प्रमुख जी. एस. पाकमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.पि.जी.धोटे ,प्रा.एस बी कुमरे , सहाय्यक ढेंगळे यांच्यासह विभागातील विद्यार्थ्यांची उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सहकार्यासाठी संस्थेचे सचिव अमित येरगुडे ,उपाध्यक्ष अभिषेक येरगुडे व प्राचार्य पिल्लारे यांचे आभार मानले.
