भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रुपापेठ येथे आँनलाईन सेवा उपलब्ध
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजना मोठ्या प्रमाणात देण्यात येत असुन या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर/कोरपना : मनोज श्रीहरी गोरे : उपजिल्हा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावातील नागरिकांना आन लाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली अतिदुर्गम आदिवासी भागातील वसलेल्या रुपापेठ या गावातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व साधारण नागरिकांना मिळावा या हेतूने भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने प्रत्येक ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे प्रत्येक नागरिकांनी ज्या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना विनंती आहे त्या त्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड,पॅनकार्ड व इतर कागदपत्रे देऊन सर्व लाभार्थ्यांनी ऑनलाईन करून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन आवाहन केले आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मनोज तुमराम ग्राम पंचायत सदस्य तथा भाजपा आदिवासी नेते यांनी गावातील नागरिकांना मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला,पुरुष,नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मनोज तुमराम यांनी केले तर आभार माडावी यांनी मानले.
