आमदार बंटी भांगडिया यांचे कडे विद्यार्थ्यांची मागणी....
नगर परिषद भरती २३ मधील लेखापाल व कर निर्धारण सेवा च्या जागेत वाढ कराण्याची केली नेवेदनातुन मागणी......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर / नागभीड
नगर परिषद कर निर्धारण व लेखापाल प्रशासकीय सेवा संवर्गातील पद भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असता शंभर टक्के पद भरती न करता अतिशय कमी पदे भरती होत असल्याने चिमूर येथील नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमदार बंटी भांगडिया यांचे कडे लेखापाल व कर निर्धारण ची शंभर टक्के पद भरती करण्याची मागणी निवेदन द्वारे केली आहे.
आमदार बंटी भांगडिया यांना निवेदन देत असताना युगधरा निखार, रागिणी कामडी, दिक्षा बनकर, मनोरमा मोडक, विद्या शेंडे, प्रतीक्षा टेनभुरकर, सारीका जिवतोडे, पल्लवी बर्गये, सीमा रामटेके, करिष्मा घरत, निखिल रुईकर, मयूर मेश्राम, अमित शेंडे, नीलेश गावंडे, किशोर चटपकर, अंकित इंदुरकर, संदिप गरमडे, अक्षय मा तिखंदे, शाहीद पठाण, शुभम सातपुते राकेश जिवतोडे तसेच भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे उपस्थित होते.
