नागरीक त्रस्त....ग्राम पंचायत सुस्त....
नालीचे पाणी शीरत आहे घरात...संपुर्ण वार्डात घाणीचे साम्राज्य....
तातकाळ सुचना करण्याची जिल्हाधीकारी यांच्या कळे सुरज नक्कोलवार यांची मागणी....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा : मनोज श्रीहरी गोरे : उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
राजुरा तालुक्यातील मौजा मुर्ती, जिल्हा चंद्रपूर येथील शिवाजी वार्ड क्रमांक १ मधील नागरीक अनेक महीन्या पासुन नालीच्या त्रासाती त्रस्त आहेत तसेच आमचे वार्डातील नाली मागील वर्षापासुन पुर्णपणे तुटली असुन सदर समस्ये बाबद ग्रा.पं. मुर्तीला सुरज नक्कोलवार यांनी निवेदण देऊन सुद्धा ग्रा.पं. ने जाणीव पुर्वक दुर्लश्य केले का? असा आरोप स्थानीक करत आहे.
सदर नालीतील संपूर्ण पाणी व घाण नागरीकांच्या घरात शीरत असल्याने स्थानीकांचा आरोग्यला धोका निर्मीण होत आहे. वार्डात संपूर्ण पाणी रस्त्यावर वाहत असुन सपुर्ण वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाद ग्राम पंचायत सचिव यांना वारंवार विनंती केली असतांनासुध्दा याकडे ग्राम पंचायत जातीने दुर्लक्ष करीत आहे. आमचेघरी लहान लहान मुले असुन वार्डात संपूर्ण घाण पसरल्यामुळे आमचे वार्डात राहणे अवघड झाल्याच मत गावकर्यांशी व्यक्त केले आहे.
तसेच शासनाकडुन निधी आल्यास तो निधी दुसऱ्या वार्डात वळवून नविन काम केल्या जात आहे. परंतु सदर नाली दुरुस्तीचे काम अध्यापही ग्राम पंचायत करण्यास तयार नाही. ग्राम पंचायतच्या या दुजाभावामुळे सदर वार्डातील नागरीक त्रस्त झाले असुन सदर नालीचे काम त्वरीत होणे आवश्यक आहे. योग्य चौकशी करून आपल्या स्तरावरून ग्राम पंचायत मुर्ती यांना पत्र देण्यात यावे व सदर नालीच्या दुरुस्तीचे काम त्वरीत करण्याबाबत सुचना द्याव्या या करीता जिल्हा अधीकारी यांना सुरज नक्कोलवार यांनी निवेदणा मार्फत मागणी केली आहे.
