Top News

काॅंग्रेस खासदार धीरज साहू चा पुतळा दहन करून केला निषेध.......Protest by burning effigy of Congress MP Dheeraj Sahu.

काॅंग्रेस खासदार धीरज साहू चा पुतळा दहन करून केला निषेध.


भाजप महिला आघाडी तालुका चिमूर च्या महिलांनी निषेधाच्या घोषणा देऊन केला निषेध.

 विदर्भ माझा न्यूज 24 -  चिमूर

     कांग्रेस चे राज्यसभा खासदार धीरज साहू यांनी भ्रष्टाचार रुपी अवैध अवाजवी संपत्ती ची ईडी मार्फत चौकशी केली असता अवैध संपत्ती बाळगणाऱ्या खासदार साहू चा पुतळा दहन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यसभेची खासदार की रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

    भाजप ऑफिस समोर भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांच्या नेतृत्वात खासदार धीरज साहू विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. पुतळ्या ला चप्पल जोडे हार टाकून दहन करण्यात आले.

यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस तथा माजी जी.प. सदस्य ममता डुकरे, माजी जी.प. सदस्य गीता लिंगायत,तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी कांग्रेस खासदार साहू च्या अवैध सपत्ती संदर्भात टिकात्मक टीका केली.

   या आंदोलन प्रसंगी भाजप महिला मोर्चा तालुका महामंत्री वर्षा शेंडे, आशा मेश्राम, दुर्गा सातपुते,भारती गोडे, छाया कंचर्लावार, रत्नमाला मेश्राम, नवघडे सह शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post Next Post