Top News

हिवरखेड येथील प्रा.मनिष गोरद, वैभव पोटे व ऋतुजा पोटे कला प्रतिभा पुरस्काराने सन्मानित.......Prof. Manish Gorad, Vaibhav Pote and Rituja Pote from Hiwarkhed were honored with Art Talent Award.

हिवरखेड येथील प्रा.मनिष गोरद, वैभव पोटे व ऋतुजा पोटे कला प्रतिभा पुरस्काराने सन्मानित



विदर्भ माझा न्यूज 24 -  मनोज भगत : विशेष प्रतिनिधी :  तेल्हारा


प्रतिभा साहित्य संघाचे १४ वे चित्रांगण कला साहित्य संमेलन दि.९ व १० डिसेंबर रोजी चिखलदरा येथे संपन्न झाले. या संमेलनात हिवरखेड येथील प्रा.मनिष गोरद, वैभव पोटे व ऋतुजा वैभव पोटे या तीन कलावंतांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कला प्रतिभा पुरस्कार २०२३ ने विठ्ठल कुलट,भास्कर पेरे पाटील,प्रकाश पोहरे,गजानन घोंगडे,गजानन मते,विजय सोसे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

 मनिष गोरद हे एक उच्चप्रतिचे चित्रकार व मूर्तिकार असून ते मातीच्या सुंदर मुर्त्या बनवतात.शिवाय त्यांनी वड,पिंपळ,आंबा या सारखे अनेक बोन्साय वृक्ष वाढवले आहेत.वैभव पोटे हे एक चित्रकार व रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध असून ते पेंटिंग क्लास चालवतात.त्यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना चित्रकार व रांगोळीकार म्हणून नावारूपाला आणले आहे.

त्यांच्याच पत्नी ऋतुजा वैभव पोटे ह्या सुद्धा निष्णात चित्रकार असून औरंगाबाद येथे भरलेल्या राज्यस्तरीय चित्र प्रदर्शनीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हिवरखेड सारख्या एका तालुकावजा खेड्यातील तिघांना एकत्र पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

या तिघांनीही पुरस्काराबद्दल प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक विठ्ठल कुलट,जिल्हाध्यक्ष अरुण काकड व तेल्हारा तालुकाध्यक्ष महेंद्र कराळे यांचे आभार मानले आहेत.

Previous Post Next Post