आमदार बंटी भांगडिया यांनी केली नागभीड येथील विद्यार्थिनीच्या शैक्षणिक मदतीसाठी आर्थीक मदत....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नगरपरिषद नागभीड येथील प्रभाग क्र.७ मधील रहिवासी अरुण पुंडलिक कामडी यांची मुलगी योगिता अरुण कामडी हिचा भंडारा येथील पूजा नर्सिंग कॉलेज मध्ये नंबर लागलेला आहे.
परंतु घरची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, शिक्षणामध्ये अडचण निर्माण होत असल्याने तिच्या वडिलांनी विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांचे कडे प्रभागातील भाजपा पदाधिकारी मार्फत रीतसर अर्ज करून मदतीची मागणी केली असता.
विद्यार्थिनीच्या मदतीला नेहमी पुढाकार घेणारे आमदार बंटी भांगडिया यांनी लगेच कॉलेजच्या नावे २५०००/- ची डीडी तयार करून तालुकाध्यक्ष संतोष रडके यांच्या मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते मुलीचे वडील अरुण कामडी यांच्या कडे नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात शैक्षणिक मदतीची डीडी सुपूर्द केली.
मदत देताना माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, तालुका महामंत्री जगदीश सडमाके, बंडू गेडाम, संजय मालोदे, दिनेश समर्थ व अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मदत देताना माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, तालुका महामंत्री जगदीश सडमाके, जिल्हा उपाध्यक्ष आनंद कोरे, बूथ प्रमुख राजू पिसे, बंडू गेडाम, संजय मालोदे, दिनेश समर्थ व अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलीच्या भविष्यासाठी सहकार्य मिळाल्याने अरुण कामडी यांनी आमदार बंटी भांगडिया व सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले.
