नागभीड तालुक्यातील मौजा मौशी येथे खास मंडई, निमित्त संगीत - बायको बिलंदर आणि. संगीत - जानवर नाटक कार्यक्रम संपन्न.
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
📌 उपस्थित मान्यवर
🔸उद्घाटक - अरविंद भुते जि. प. क्षेत्र प्रमुख कानपा/मौशी
🔸सह उद्घाटक - संतोष रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड
🔸अध्यक्ष - संजय गजपुरे माजी जि. प. सदस्य
🔸सह अध्यक्ष देवा बावनकर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष
तालुक्यातील मौजा मौशी येथे मंडईच्या निमित्ताने जय बजरंग नाट्यकला मंडळ आणि नवतरुण नाट्यकला मंडळ मौशी यांच्या वतीने लावणी डान्स ग्रुप आणि संगीत - बायको बिलंदर आणि जानवर, नाटकाचं आयोजन दी.09-12-2023 ला करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद भुते आणि नाटकाचे सह उद्घाटक संतोष रडके, तालुका अध्यक्ष नागभीड व अध्यक्ष संजय गजपुरे, सह अध्यक्ष देवा बावनकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागभीड, बालू नवघडे, नोवेश राऊत ,ओमदेव दोनाळकर, विकास मानापुरे, राजू गजपुरे, संतोष कोलते, संजय ठाकरे, विलास गजपुरे, टीकाराम सहारे, किरण ताई सिडाम, ज्योती गजपुरे,अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.
कार्यक्रमातील उपस्थित बहुसंख्य प्रेक्षकांना संतोष रडके, देवा बावनकर आणि अरविंद भुते, संजय गजपुरे यांनी आमदार बंटी भांगडीया. यांच्या क्षेत्रात केलेल्या दमदार विकास कामाची माहिती देत खूप मोलाचे मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
