Top News

आमदार बंटी भांगडिया यांचे कडून तलावात डुबून आकस्मिक निधन झालेल्या नवानगर नवखळा येथील युवकाच्या परिवारास सांत्वनपर मदत....MLA Bunty Bhangdia offered consolation to the family of a youth from Nawanagar Navkhala who died suddenly after drowning in a lake....

आमदार बंटी भांगडिया यांचे कडून तलावात डुबून आकस्मिक निधन झालेल्या नवानगर नवखळा येथील युवकाच्या परिवारास  सांत्वनपर मदत....


विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर / नागभीड

नगरपरिषद क्षेत्रातील नवानगर नवखळा येथील युवक प्रमोद अर्जुन नान्हे वय 30 वर्ष हा शनिवारला मासे पकडण्यासाठी घोडाझरी तलावात गेला असता. तिथे डुबून त्याचे दुखद निधन झाले व नान्हे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

घटनेची माहिती मिळताच चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांनी तालुकाध्यक्ष संतोष रडके यांच्या मार्गदर्शनात नान्हे  परिवारास सांत्वनपर मदत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या  हस्ते पाठविली. 

मदत देताना भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवक रुपेश गायकवाड ,रमेश भानारकर, मनोहर नान्हे, मिथुन नान्हे ,करण करकाडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post