भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कॉंग्रेसचे नेते प्रिंयक खरगे यांचा जाहीर निषेध करुन आंदोलन करण्यात आले.
विदर्भ माझा न्यूज 24 - कोरपना : मनोज श्रीहरी गोरे : उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
कोरपना तालुका भाजपच्या वतीने कर्णाटकचे बेताल मंत्री प्रिंयक खरगे यांच्या विरोधात आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला स्वतंत्र विर वि. दा. सावरकर यांच्या विरोधात बेलगाम वक्तव्य करून सर्व देशभक्त भारतीयांच्या भावनांना ठेच पोहोचविणारे काॅंग्रेसचे कर्नाटकचे मंत्री प्रिंयक खरगे यांचा जाहीर निषेध करुन आंदोलन करण्यात आले.
नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,अरुण डोहे नगरसेवक,अरुण मडावी माझी सरपंच, कवडु पा जरिले तालुका उपाध्यक्ष,संजय मुसळे माझी सभापती,अमोल आसेकर माझी नगरसेवक,शिकांत आडकीने उपसरपंच,राकेश अरोरा,निखिल भोंगळे,जगदीश पिंपळकर,तिरुपती कन्नाके,सुरेश टेकाम,बंडु गोंडे, रवि टेकाम आदी भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले स्वतंत्र विर वि. दा. सावरकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य चुकीचे व निराधार आहे. हा थोर पुरुषांचा व देशाचा अपमान आहे. आम्ही ह्या कटबोड्या कॉंग्रेसचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने करून या बेजबाबदार मंत्र्याला धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर येऊन ठीक ठिकाणी यांच्या विरोधात आंदोलन करून जाहीर निषेध करत आहो. तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व निषेध केला या जाहीर निषेध आंदोलनाला भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
