भूमिगत विद्युती करण्याच्या कामाची चौकशी करा......भारतीय युथ टायगर संघटना विदर्भाच्या वतीने मागणी.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरांमध्ये नगरपरिषदे कडून करण्यात आलेल्या भूमिगत विद्युतीकरणाचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे असून. अनेक ठिकाणी विद्युत वाहनांचे तार हे जमिनीच्या बाहेर आलेले आहे त्याचप्रमाणे रिस्टोरेशनचे काम सुद्धा चुकीचे झालेले आहे. काम सुरू असतांना नगरपरिषदेच्या अधिकारी त्याच्याकडे दूर्लक्ष केले.
बऱ्याच ठिकाणी काँक्रिटीकरनाचे काम हे फक्त दोन-तीन इंच केलेले आहे व खड्डे तीन फूट खोदायला हवे होते ते सुद्धा त्यांनी एक-दीड फूट खोदूले व खोदल्यानंतर त्यात पी.सी.सी. सुद्धा करण्यात आलेली नाही.
यामुळे जीवित हानी होण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. जर का हे काम लवकरात लवकर सुरडीत केले नाही तर भारतीय टायगर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व याची सविस्तर जबाबदारी नगरपरिषद बल्हारशाह ची असेल.
अशी माहिती भारतीय टायगर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झांमरे यांनी दिली. निवेदन देत असताना भारतीय टायगर संघटनेचे दर्शन मोरे, सुरज चौबे, रतन फुलकर, समीर खान, मनोज बालमवार उपस्थित होते.
