Top News

ओ.बी.सी. क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते यांच्या प्रयत्नांना यश.....O.B.C. Kranti Morcha President Sanjay Mate's efforts are successful.....

ओ.बी.सी. क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते यांच्या प्रयत्नांना यश.....

 


विदर्भ माझा न्युज 24 - भंडारा

 भंडारा जिल्ह्यातील भंडारा,पवनी,मोहाडी,तुमसर, लाखनी, व लाखांदूर या तालुक्यात ४,५, व ६डिसेंबर रोजी निसर्गाच्या अवकृपेमुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील धान पीक पाण्यात भिजल्याने धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री डॉ गावित यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येणे आवश्यक होते. 



 परंतु पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ओ. बी. सी. क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांच्या निदर्शनास येताच ते स्वतः कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन नुकसान झालेल्या धान पिकाची प्रत्यक्ष मोका पाहणी केली आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले असल्याचे वृत्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करून पालकमंत्री डॉ. गावित यांनी भंडारा जिल्ह्यात येऊन पीक नुकसानीचा आढावा घ्यावा आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी कार्यकर्त्यांसह मागणी केली असता सदर वृत्ताची दखल घेत पालकमंत्री डॉ. गावित तातडीने भंडारा जिल्ह्यात दाखल झाले यावरून ओ.बी.सी. क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश असल्याची चर्चा शेतकरी बांधव करीत आहेत.

Previous Post Next Post