Top News

विक्की दुपारे यांनी मानले ना.मुनगंटीवार यांचे आभार.....Vicky Dupare thanked Mr. Mungantiwar.....

विक्की दुपारे यांनी मानले ना.मुनगंटीवार यांचे आभार......तालुका स्तरीय तंबाखू नियंत्रण समिती मध्ये सदस्य पदी नियुक्ती.....



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

सुधीर मुनगंटीवार वने सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय यांच्या मार्फत बल्हारशाह तालुका स्तरीय तंबाखू नियंत्रण समिती गठीत करण्यात आली. यामध्ये सदस्य पदी विकास उर्फ विक्की दुपारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बद्दव विक्की दुपारे यांनी ना.मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

सदर समितीमध्ये अध्यक्षपदी तहसीलदार कांचन जगताप, सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम, सदस्य गट विकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, सदस्य  पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सदस्य  वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉ.विजय वडस्कर, सदस्य  आरोग्य व तंबाखू नियंत्रण या क्षेत्रात काम करणारी संस्थाचे श्रवण सातपुते या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.  समितीच्या पहिल्या बैठकीत  तालुक्यातील लोकांमध्ये जागृतता करून तंबाखू मुळे शरीरावर कशे दुष्परिनाम  होत आहेत.जागरूकता कशाप्रकारे करण्यात येईल. यावर विचार विमर्श करण्यात आले.

Previous Post Next Post