Top News

उपोषण सुरू असूनही जर प्रशासन मागण्या पूर्ण करत नसतील तर कंपनी बंद करणार_सुरज ठाकरे यांचा प्रशासनाला इशारा...... Suraj Thackeray warns the administration if the administration does not meet the demands despite the hunger strike.

उपोषण सुरू असूनही जर प्रशासन मागण्या पूर्ण करत नसतील तल कंपनी बंद करणार_सुरज ठाकरे यांचा प्रशासनाला इशारा......




विदर्भ माझा न्युज 24 - मुल


मूल येथील जी आर कृष्णा फेरो अँड अलाय कंपनी, मरेगाव येथील वाहान चालक तथा ऑपरेटर या कामगारांवर येथील प्रशासनाद्वारे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मानसिक, शारीरिक तथा आर्थिक पिळवणूक करून कामगारांवर अन्याय होत असल्याबाबत दिनांक ०४/०९/२०२३ रोजी कामगार सहाय्यक आयुक्त तथा  संबंधित विभागामध्ये जय भवानी कामगार संघटनेतर्फे समस्त कामगारांच्या वतीने जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  सुरज ठाकरे यांनी तक्रार दिली होती. परंतु महिना ओलांडून देखील कामगारांच्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून दिनांक ०१/११/२०२३ पासून कामगारांचे  सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मुल येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

 सदर मागण्या प्रलंबित राहण्याचे एकमेव कारण म्हणजेच चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावलौकिक असून या ठिकाणी कामगार वर्ग खूप जास्त प्रमाणात आहे. जिल्ह्यातील बहुतांश कंपनीमध्ये कामगार कायद्याचे पालन होत नसल्याकारणाने निश्चितच कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्यास कामगारांचा तक्रारी देखील प्रशासन दरबारी येत असतात.  परंतु सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये कायमस्वरूपी आयुक्त नसल्याकारणाने सदस्तीतीत जे आहेत त्यांच्याकडे तीन जिल्ह्याचा प्रभार असल्याने विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयुक्त आठवडाभर उपस्थित राहत नाही. या कार्यालयातील कर्मचारी आयुक्त साहेब नसल्याचे कारण सांगत कामगारांच्या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याऐवजी  सदर प्रकरण आयुक्त साहेब येत पर्यंत प्रलंबितच असते. अशाच प्रकारचे वेगवेगळे कारण सांगत एखादं शुल्लक प्रकरण जरी असलं तरी काही प्रकरणाला दोन ते तीन वर्ष सुद्धा या कार्यालयात लागत असते. ही डोकेदुखी अनेक वर्षांपासूनची या कार्यालयाबाबत आहे. याव्यतिरिक्त सदस्तीतीमध्ये  कामगारांच्या तथा जनतेच्या कायदेशीर रास्त मागण्यांना सुद्धा उपोषण, आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याशिवाय प्रशासन लक्ष सुद्धा देत नाही अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जिथपर्यंत कोणी उपोषण आंदोलन करणार नाही तिथपर्यंत प्रशासन लक्ष देणार नाही अशा प्रकारची एकंदर भूमिका सध्या प्रशासनाची दिसत आहे. यावरून जे लोक लोकशाही मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता कुठला पवित्र हाती घेत नाही अशा लोकांची प्रकरणे तर निश्चितच प्रलंबित असतील यात काही शंका नाही.

सध्याची परिस्थितीत कायदेशीर मागण्यांकरिता देखील उपोषणाला बसावे लागत आहे, यापेक्षा आणखी मोठी असफलता  या राज्य शासनाची व प्रशासनाची दुसरी कुठली असेल?

करिता आता तरी कामगारांच्या कायदेशीर रास्त मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष न व्हावे करिताआज परत जय भवानी कामगार संघटनेतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये कामगारांच्या रास्त मागण्या तात्काळ पूर्ण करण्याकरिता तथा कामगारांना न्याय मिळवून देण्या करिता आज दिनांक ०२/११/२०२३ रोजी आणखी एक स्मरण पत्र  सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये देण्यात आले. व सदर निवेदनामध्ये कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास समस्त कामगारांसह जी आर कृष्णा फेरो अँड अलाय कंपनी, मरेगाव ही कंपनी बंद करण्याचा इशारा या वेळेस  सुरज ठाकरे यांनी दिला.

Previous Post Next Post