Accident Breaking.......खासदार अशोक नेते यांच्या गाडीला विहिरगांवजवळ किरकोळ अपघात.....
विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली : संदिप तेलंग, जिल्हा प्रतिनिधी +919823737684
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.
खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या MH 33, AA 9990 क्रमांकाच्या वाहनाने गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवाजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न देता तातडीने ब्रेक लावले. पण त्या प्रयत्नात ट्रकच्या एका कॅार्नरला मागून हलकीशी धडक बसली. त्यात खा.नेते यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले. मात्र नेते यांच्यासह त्यांच्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही.
यानंतर दुसऱ्या वाहनाने खासदार अशोक नेते हे गडचिरोलीकडे निघाले. गडचिरोलीत पोहोचल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील नियोजित दौऱ्यासाठीही रवाना झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खासदार अशोक नेते यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ईश्वरी कृपेने कोणालाही दु:खापत झालेली नाही, असे खासदार नेते यांनी सांगितले.
लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम व आपुलकी जिव्हाळा सदैव माझ्या पाठीशी आहेच.जनतेनी दिलेल प्रेम माझ्या हृदयात असून आपुलकीची भावना मी या प्रसंगी व्यक्त करतो अस खासदार नेते म्हणाले.
