Top News

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली...... School Management Committee meeting concluded at Zilla Parishad High School Kanhalgaon...

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली......


विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : ग्रामीण प्रतिनिधी : नितेश केराम 

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक, शारदाबाई मेश्राम उपाध्यक्ष, किशोर जेनेकर,प्रतिभा पडोळे, डोहे , मडावी , सुरेश येरेकर, सविता  वाघाडे, चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते. नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी बैठकीत विविध विषय मांडले या मध्ये गणवेश,पोशन आहार,किचन सेड,स्वागत गेट,वाल  कंपाऊनड,विध्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तसेच इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली  या बैठकीला मोलाचे सहकार्य  जिवणे ,अफसाना ,भगत मॅडम,ताराबाई मेश्राम आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले बैठकीचे संचालन स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक यांनी केले तर आभार जिवणे  यांनी मानले बैठकीला पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post