Top News

बजरंग आणी छोटा मटका च्या युद्वात शेतकर्याचे नुकसान.....Farmer's loss in battle of Bajrang and Chhota Matka.....

बजरंग आणी छोटा मटका च्या युद्वात शेतकर्याचे नुकसान.....


चिमुर युवक काँग्रेसच्या विनंतीला मान देत वनपरीक्षेत्र अधीकार्यांनी दिली नुकसान ग्रस्त शेतकर्याला तात्काळ मदत...




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपुर/ चिमुर

दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी वहाणगाव शेत शिवारामध्ये वाघाने एका बैलाची शिकार केली, शिकारी वरून दोन वाघांचे म्हणजेच *"बजरंग व छोटा मटका"* नावाच्या वाघांत भांडण होऊन खूप मोठी लढत झाली व त्या झुंजीत एका *"बजरंग"* नावाच्या बलाढ्य वाघाचा मृत्यू झाला. 



 ही बातमी ऐकताच चिमूर परिसरातील लोकांनी मृत झालेल्या वाघाला बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोठी गर्दी केली होती. त्यावेळी वनविभागाच्या वाहनांनी सदर घटनेचा पंचनामा तसेच ईतर कार्यवाही करण्यात आली ज्या ठिकाणी त्या वाघाची लढत झाली त्या शेतमालकाच्या शेतीमध्ये रब्बी हंगाम सुरू झाल्याने पिकांची पेरणी केली होती त्या पिकाची फार मोठी नुकसान झालेली असल्याने सदर शेतकरी हा हताश होऊन व दुःखी होऊन युवक काँग्रेस ला आपली फोन द्वारे परीस्थीथी कळविली असता युवक काँग्रेसने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन शेतकरी नामे  सुभाष दोडके यांची व वहानगाव येथील गावऱ्यांना भेटून सदर घटनेबाबत सविस्तरपणे माहिती घेऊन ज्या शेतकऱ्याची सदर घटनास्थळी घटना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या व जाणाऱ्या गर्दीने व मुख्य म्हणजे वनविभागाने चौकशी करिता शेतमालाच्या शेतीमध्ये वाहनांच्या ताफा घातल्याने शेतमालाची कोणतीही तमा न बाळगता आपली वाहने शेतामधून चालवली. शेतामध्ये हरभऱ्याचे पीक असून सर्व पीक भुईसपाट झाले, शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली, त्याच्या शिकार झालेल्या बैलाची नुकसान भरपाई त्याचबरोबर त्याचेवर आलेले दुबार पेरणीचे संकट कमी करण्यासाठी वन विभागाने तात्काळ मदत दिली पाहिजे यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने वनविभाग व शेतकऱ्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यात आली.


  तसेच शेतकऱ्याला तात्काळ स्वरूपात काही नुकसान भरपाई देण्यात यावी व सदर शेतमालाच्या नुकसानीची योग्य चौकशी करून परिपूर्ण नुकसानभरपाई  शेतकऱ्याला देण्यात यावी अन्यथा युवक काँग्रेस चिमूरच्या माध्यमातून वनविभाग चिमूर येथे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबतीने आक्रोशात्मक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावर वनविभाग चिमूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी  किरण धानकुटे  यांनी शेतकऱ्याच्या व्यथेची जाणीव लक्षात घेता व युवक काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन तात्काळ स्वरूपात शेतकरी सुभाष दोडके यांना 5 हजार रुपयांची मदत करून सदर नुकसानीची योग्य नुकसानभरपाई देण्यात येईल असे विश्वास जनक आस्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर  किरण धानकुटे यांनी देऊन शेतकऱ्यांची समज घालण्यात आली. 

युवक काँग्रेस चिमूर च्या माध्यमातुन हाकेला धावून दुःखी शेतकऱ्यांची मदत केल्याने संबंधित शेतकऱ्याने व वहानगाव येथील शेतकरी बंधू यांनी आनंदाने आभार व्यक्त केले.

यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष  प्रशांत डवले, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नागेंद्र  चट्टे, विलास मोहीनकर सरचिटणीस, ऋषी घरत, कुणाल रामटेके राजू गेडाम, दिनेश  वाळके, ऋषी हिंगणकर,राजू कुळमेथे,गौरव दोडके,पवन अंद्रस्कर,मुरलीधर दोडके,गजानन दोडके,आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post