मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागभीड येथे धावती भेट....
भाजपचे ज्येष्ठ नेते व नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर/ नागभिड
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली येथून नागपुर कडे जात असतांना मंगळवारी दि.१४ नोव्हेंबर ला रात्री ९ वाजताच्या सुमारास नागभिड येथील श्री राममंदिर चौकात भाजपचे ज्येष्ठ नेते व नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी कारमधून उतरून स्वागताचे स्वीकार केले नागभिड येथील नगर परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत, अशी चर्चा दुपारी 3:00 वाजे पासुनच तालुक्यात रंगली होती. त्यादृष्टीने शहरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र नागभिड येथे पोहोचण्यास मुख्यमंत्रांना बराच विलंब झाल्याने नगर परिषदेला भेट देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे हे कारमधून श्री राम मंदिर चौकात आले. कारमधून खाली उतरल्यानंतर त्यांनी हात उंचावून नागरिकांच्या स्वागताचा स्वीकार केला.
स्वागताप्रसंगी चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष रडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण, नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धमाणी, माजी अध्यक्ष हनिफ जादा आदींसह तालुक्यातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.


