युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा.निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नाला यश....विद्यार्थांना मिळाला दिलासा।
गोंडवाना विद्यापिठाचे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कॅरी फाॅरवर्ड संदर्भात पत्र जाहिर....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , सरदार पटेल विधी महाविद्यालयातील विद्यार्थी शिष्टमंडळ गोंडवाना विद्यापिठाचा यावर्षी चा निकाल खुप कमी लागल्याने जवळ पास ६०% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्याने त्यांचे वार्षिक नुकसान होणार या भितीने यावर्षी पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ यांच्या प्रमाणे गोंडवाना विद्यापीठात "कॅरी आॅन" लागू करावा यासाठी पुढाकार घ्यावा याकरिता सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांना भेटायला आले होते.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताकरिता लगेच विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून या विषयासाठी कुलगुरू यांच्या सोबत वारंवार चर्चा करून हा विषय घेऊन पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना आज "कॅरी फाॅरवर्ड" लावून विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान होण्यापासून वाचविले व यामुळे विद्यार्थ्यांना एक संधी मिळून पुन्हा समोरच्या वर्गात प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला त्याबद्दल विद्यार्थ्यांनी युवासेना पुर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांचे व शिवसेना युवासेना चे आभार मानले.
