तीन ग्रामपंचायत सदस्यासह अनेक आदिवासी कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ग्रामीन प्रतिनिधी, नितेश केराम 8698423828
राजुरा तालुक्यातील भेंडवी येतील तीन ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक आदिवासी कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. शेतकरी संघटने चे नेते माजी आमदार जेष्ट विदर्भवादी नेते ॲड. वामनराव चटप यांनी शेतकरी संघटनेचा बिला लावून या सर्वांचे शेतकरी संघटनेत स्वागत केले.
भेंडवी ग्रामपंचायत सदस्य रमेश भीमराव मडावी, मोहपत दौलत, कुळसंगे सीताराम कनाके या तिनी सदस्यांचा व आदिवासी नेते सुभाष मंडीगा, लिंबाराम कुमरे, रवी तोंडासे, या सह अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला या वेळी चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती निळकंठराव कोरांगे ॲड. श्रीनिवास मुसळे, अरुण कष्टी, कपिल इदे, मधुकर चिंचोलकर या सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी च्या अनेक समस्या असून सुद्धा समस्या सोडविण्यासाठी कोणीही प्रामाणिकपने पर्यंत करतांना दिसत नाही मात्र शेतकरी संघटने चे नेते आमदार वामनराव चटप हे आम्हा आदिवासीचे प्रश्न मोर्चा काढून अथवा विविध मध्यमातून शासन दरबारी मांडण्याचा पर्यंत करीत असतात त्यांच्या संगर्षपूर्ण कार्याला प्रतिसाद देत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहायचा निर्णय घेतला या वेळी आदिवासी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
