सर्वोदय विद्यालय बल्हारशाह चे ज्येष्ठ शिक्षक राजेश मारपल्लीवार यांचा शाळे तर्फे शिक्षक दिनानिमित्य सत्कार.....स्वयंशासन उपक्रम संपन्न !
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
काल दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोज मंगळवार ला सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे दिवंगत राष्ट्रपति तथा शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून व प्रतिमेस हार चढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी "स्वयंशासन" हा उपक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना केळी ,चॉकलेट, लाडू चे वाटप करण्यात आले. तसेच आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आर.एन.मारपल्लीवार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका कु.गजबे, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जांभुळे तसेच शिक्षीका किरपाल प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका घुगुल तर आभार प्रदर्शन शिक्षीका बुटले यांनी केले.







