नागभीड तालुक्यात हत्तीचा शिरकाव.....शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
काही महिन्यांपूर्वी हत्तींचा कळप उडीसा राज्यातून छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला होता. कळपाने धानोरा, आरमोरी, वडसा, कोरची परिसरात धुमाकूळ घातली होती. कळपातील भटकलला एक हत्ती नागभीड वनपरिक्षेत्रातील गोवारपेठ व तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली या परिसरात आढळुण आल्याने खळबळ उडाली आहे.
नागभीड व तळोधी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या जंगलालगतच्या गावांत वाघ, बिबट, रानगवे, अस्वलाची दहशत असतानांच आता हत्तीने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
सात ते आठ दिवसांपासून गोवारपेठ, देवपायली, नवेगाव, हुंडेश्वरी या परिसरात हत्तीचा वावर आहे. हत्ती धानपिकाचे नुकसान करीत असल्याची प्राथमीक माहीती आहे.सदर हत्ती मानवीजिवावर ही हल्ला करू शकतो. भटकलेला हत्ती एकारा जंगल परिसरातून आवळगाव, मुडझा, नवेगाव, हुंडेश्वरी, देवपायली जंगल परिसरातून आला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
