मूल तालुक्यात रेशन दुकानात मिळत आहे निकृष्ट दर्जाचा मक्का !
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मूल तालुक्यात रेशन दुकानात पुरवठा विभागाकडून अन्नधान्य पुरवठा करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत गरिबांना दोन वेळचा अन्नाची सोय व्हावी म्हणून , सरकारकडून स्वस्त दरात दर महिन्याला धान्य उपलब्ध करून दिले जाते.शासनाकडून काही महिन्यापूर्वी गहू,साखर, तांदूळ याचा पुरवठा केला जात होता परंतु या एक दोन महिन्यापासून शासनाने गहू कमी करून मक्का पुरवठा केलेला आहे. सदर या महिन्यांमध्ये काही रेशन दुकानात मक्का निष्कृष्ट दर्जाचा पुरवठा झालेला आहे . सदर हा मक्का रेशन दुकानातून , लाभार्थ्यांना पुरवठा केला जात आहे, एक प्रकारे शासनाकडून गरिबांची थट्टा केल्या प्रकारे आहे सदर घटनेचा गांभीर्य ओळखून पुरवठा विभाग मुल हे या प्रकरणावर लक्ष देणार का?

