Top News

Honored by Retired Principal Sanjay Thawari Mission IAS.

सेवानीवृत प्राचार्य संजय ठावरी मिशन आयएएस द्वारा सन्मानित.





 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


 कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी सर यांचा नुकताच डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी द्वारा सन्मानित करन्यात आले. 

कोरपना तालुक्यात "मि आयएएस होनारच" या कार्यशालेचे आयोजन ३१ ऑगस्ट ते १ ते २ सप्टेंबर ला अकरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनि आयोजन केले होते. दरम्यान मिशन सेवा अभ्यासीका कोरपना येथे १० वी १२ वी नंतर पुढे काय ? तसेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा त्यांनी आयोजित केली होती त्यात डॉ.नरेशचंद्र काठोडे संचालक डॉ पंजाबराव देशमुख आयएएस एकेडमी अमरावती यांनी विद्यार्थी व पालकाना "मि कलेक्टर होनार" यावर मार्गदर्शन केले तर, करीअरवाला पुस्तकांचे लेखक प्रा. विजय मुसले यांनी मार्गदर्शन केले. सेवेत असताना एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ध्येय उराशी बालगुन गुणवत्तापूर्ण शिक्षन देन्याचे कार्य केले, स्पर्धा परीक्षेशाठी माजी विद्यार्थी यांस प्रवृत्त केले, कोरपना येथे वातावरण निर्मिति झाली आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आज अनेक विद्यार्थी त्या मार्गावर आहे मुले कायम, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तिनुसार स्वत: प्रशासकीय सेवेत लागली तरी इतराना उपदेश करीत आहे.


 जून २०१८ ला स्कॉलर्स सर्च एकेडमी वणी रोड येथे तालुकास्तरीय "मि आयएएस होनार" ही आपल्या स्नेहीजनाच्या सहकार्यन  डॉ. काठोडे यांची कार्यशाला आयोजित केली होती. सेवानिवृतीनंतर ही मूलाना, पुस्तक वितरीत करुण उपदेश करित असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन मिशन आएएएस तर्फे कार्यक्रमात  स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबददल विधान परिषद सदस्य नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले व डॉ.नरेशचंद्र काठोडे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवीन्यात आले. मागील वर्षी स्टुडेंट फोरम ग्रुप तरफे मोरेश्वर टेभुर्डे  यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिक मंडल काटोल द्वारा मागील वर्षी सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कारासाठी जिल्ह्यातून निवड झाली व शिक्षक दिनि पुरस्कार वितरण करण्यात आले.


 नुकतेच त्यांनी प्रभु रामचन्द्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा, एमिनेंस कॉन्वेंट कोरपना, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर, प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय , लालबहादुर शास्त्री विद्यालय, स्कॉलर्स सर्च एकेडमी, स्व संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय कोरपना, शारदा कनिष्ठ महाविद्यालय धानोली, स्व भाऊराव पाटील चटप माध्य. आश्रम स्कूल, महात्मा गांधी  कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाला आयोजित केल्या. ते मुख्य संयोजक होते. त्यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कृत केल्याने परीसरातील सर्व स्तरातुन स्नेहीजन, माजी विद्यार्थी, मुख्य. प्राचार्य, शिक्षक करीअर ग्रुप चे सदस्य यानि अभिनंदन केले आहे. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो.



Previous Post Next Post