Top News

Sanjay Gandhi Niradhar Yojana meeting in Korpana approved 218 cases in a competitive atmosphere.... Sudhir Mungantiwar Guardian Minister's visit to Sanjay Gandhi Destitute Beneficiaries increased subsidy of Rs 1500 Narayan Hivarkar BJP Taluka President and Sanjay Gandhi Destitute Yojana President thanked him...

कोरपना येथील संजय गांधी निराधार योजना बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात 218 प्रकरणांंना मंजुरी....


सुधीर मुनगंटीवार पालक मंत्री यांची संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना पोळा भेट 1500 रुपये अनुदानात वाढ नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्षांनी त्यांचे मानले आभार......



 विदर्भ माझ न्युज 24 - कोरपना  : नितेश केराम , ग्रामीण  प्रतिनिधी 

तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजना बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख पाहुणे  वटकर तहसीलदार साहेब,चिडे नायब तहसीलदार, मनोहर कुळसंगे सदस्य, अमोल आसेकर सदस्य,निखिल भोंगळे सदस्य लक्ष्मी बाई कुळमिथे सदस्य,सुरेश टेकाम सदस्य,  बाबाराव पोहनकर सदस्य, नारायण राठोड सदस्य, अमोल लोकरे कर विभाग अधिकारी नगर पंचायत कोरपना आदी मान्यवर उपस्थित होते  वटकर तहसीलदार साहेबनी नवनिर्वाचित  नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्षाचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व पहिल्याच बैठकीत 218 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली मा ना  सुधीरभाऊ मुनगंटीवार पालक मंत्री यांनी लाभार्थ्यांना पोळा भेट अनुदानात 1500 रुपये वाढ केल्या बद्दल त्यांचे कौतुक केले व सर्वांनी आभार मानले  नारायण हिवरकर यांनी सर्व गरजु,गोर गरीब लाभार्थ्यांनी स्वता पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा आम्ही सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवुण देऊ व सर्वोतोपरी मदत करु असे आवाहन केले बैठकीला मोलाचे सहकार्य  ढोबळे बाबु मालेकर मडम, महादेव कुळमिथे आदी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post Next Post