जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनूर्ली येथील विद्यार्थ्यांनी राखी तयार करून भरवले त्याचे प्रदर्शन......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : दिपक चिवाने ग्रामीण प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमीक शाळा,सोनूर्ली येथील पहिली ते सातवीच्या वीद्यार्थ्यांनी कार्यानुभव उत्पादक उपक्रमांतर्गत राख्या बनवल्या. त्याचे प्रदर्शन शाळेत भरवण्यात आले.
मुख्याध्यापक गुणवंत राठोड व शिक्षक सुनिल अलोने, संजय कुडसंगे, विजय राऊत व शिक्षिका शारदा बोरकर, प्रभावती हिरादेवे,मेनका मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राख्या बनविल्या. लोकर, मणी, ओम, गणपती, रुद्राक्ष,स्माईली अशा अनेक डिझाईनमध्ये राख्या प्रत्यक्ष बनविण्याचा आनंद सर्वच विद्यार्थ्यांनी घेतला.
या वेळी पालकही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांचे शाळेत प्रदर्शन भरवण्यात आले. या वेळी तयार झालेल्या उत्कृष्ट रख्याना बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यात आला. तयार केलेल्या राख्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहेत.

