स्वराज्य आधार फॉउंडेशन,राजुरा च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्यातबाबत मुख्याधिकार्यांना निवेदन......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
माळी वार्ड नं. १ राजुरा येथे कांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक आहे व महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या डोक्यावरील फेट्याचे पोपडे (चिपोरे) निघत आहे. तरी मागील ४ ते ५ वर्षापासून नगर परिषद,राजुरा महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करीत आहे.
हि बाब लक्षात घेत स्वराज्य आधार फॉउंडेशन,राजुरा च्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांचाशी स्मारकाच्या संवर्धन व सोंदर्यीकरणच्या समसे वर चर्चा करून निवेदन देण्यात आले व मुख्याधिकारी यांनी १ महिन्या च्या आत पूर्ण काम होऊन जाईल असे सांगितले अन्यथा १ महिन्याच्या आत स्मारकाची दुरुस्ती झाली नाही तर नगर परिषद,राजुरा चा तिव्र निषेध करू असे ठाम मत यावेळी स्वराज्य आधार फॉउंडेशने मांडले.


