Top News

Abhang Sahitya Samman" award distribution ceremony concluded

अभंग साहित्य सन्मान" पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


 विदर्भ माझा न्युज 24 - झरी 



आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, समाजक्रांतिकारक तथा मराठी साहित्यविश्वाचे मानबिंदू ठरलेले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जागतिक मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा व्हावा, अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा जागर व्हावा, तसेच या दिनाचे औचित्य साधत साहित्यक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकास “अखंड अभंग साहित्य सन्मान" पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यास्तव सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघप्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, वणी च्या वतीने वीरभगतसिंग अभ्यासमंडळ येथे दि. ०५ ऑगस्टला करण्यात आले. सत्कारमूर्ती ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अनंता सूर यांना अखंड अभंग साहित्य सन्मान पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाची माजी अध्यक्ष मंगेश खामकर व विनोद बोबडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सत्कारमूर्ती प्रा.डॉ.सूर यांनी पुरस्कार स्वीकारून उपस्थित्यांना मार्गदर्शन करीत आयोजकांचे आभार मानले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विजेत्यांना प्रमाणपत्र आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांनी त्यांचे मनोगत करीत मराठा सेवा संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर यांनी सत्कारमूर्ती प्रा.डॉ. सूर आणि विजेत्यांचे अभिनंदन करीत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष मंगेश खामनकर यांनी प्रास्ताविकरून मराठी अध्यक्ष यांनी प्रास्ताविकेतून जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची भूमिका मांडली. यावेळी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशाकला कोवे, बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन मारोती जीवतोडे तर उपस्थित्यांचे आभार अमर डाहुले यांनी मानले.

Previous Post Next Post