ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांसाठी सुरक्षित नाही ही बाब आज सकाळी घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाली, तशी जिल्हात सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आज सकाळी 8:00 वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डिलिव्हरी वार्डातून 4 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाली, मात्र पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या 3 तासात आरोपीचा छडा लावण्यात मोठे यश आले.चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात,रुग्णालयात खाजगी सुरक्षा रक्षक सुद्धा आहे, तरीसुद्धा आज सकाळी 8 वाजता डिलिव्हरी वार्डातून 4 दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना घडली, चोरी झाल्यानंतर मातेने रुग्णालय परिसरात हंबरडा फोडला.
सदर घटनेची माहीती पोलिसांना देण्यात आली,माहीती मीळताच पोलिसांच एक चमु पाचारण करण्यात आले, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगळे आपल्या चमुसह रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही तपासले अस्ता आरोपी एका कॅमेऱ्यात कैद झाले, व त्यांनी तात्काळ आपली चमू आरोपींच्या मागावर पाठवली व अवघ्या 3 तासात हिंगणघाट येथून आरोपीला बाळासाहित ताब्यात घेण्यात आले.
आरोपी ही महिला असून ती रुग्णालय परिसरात 3 ते 4 दिवसापासून वावरत होती, फिर्यादी महिलेसोबत तिने ओळख निर्माण करीत तिचे विश्वास संपादन केले व त्यांनतर आज 20 जून ला सकाळी बाळा ला सोबत घेत रुग्णालयातून ती महिला पसार झाली होती, मात्र चंद्रपूर पोलिसांच्या तत्परतेने आरोपीला ताब्यात घेण्यास मोठे यश मिळाले आहे.

