Top News

Pushpa Pode (Pachbhai) is the only nursing teacher from Maharashtra to be awarded the 2023 National 'Florence Nightingale' Award..... Award distribution by President Draupadi Murmu will be held at Rashtrapati Bhavan on 22nd June 2023..... National 'Florence Nightingale' Award is the highest award in the field of Nursing....

महाराष्ट्रातुन एकमेव नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) ठरल्या 2023 राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ अवॉर्ड च्या मानकरी.....


राष्ट्रपती भवन येथे होणार 22 जून 2023 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण.....


राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ अवॉर्ड नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार....



 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल  अवॉर्ड हा जाहीर झालेला असून पुष्पा पोडे या मागील 2001 पासून नर्सिंग क्षेत्रात विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात आहे पोडे यांनी 2001 मध्ये ग्रामीण रुग्णालय अहेरी इथून आपल्या कार्याची सेवा सुरू केली गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी अवरित पाच वर्षे सेवा करत रुग्णांची सेवा केली,

हे ही वाचा👉🏻 ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची बदली झाल्यानंतर बावीस वर्ष त्यांनी रुग्णसेवा केलेली असून कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून कोरोनाशी लढण्यासाठी तयार केला आणि स्वतःही कोरोना सारख्या आपत्ती काळात त्यांनी स्वतःला अविरत झोकून देऊन रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत  त्यांना अनेक जिल्यातील पुरस्काराने सुद्धा सम्मानीत केलं असून त्यांना नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांनी पोडे  यांची निवड  राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी करण्यात आली

हे ही वाचा👉🏻 ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......

   त्यांना दिनांक 22 जून रोजी मा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड वितरित करण्यात येणार आहे या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे वरिष्ठ त्यांचे

सहकारी त्यांचा परिवार यांना दिलेला असून पुढेही त्यांनी अविरत कार्य कराचे निश्चय केला आहे हा पुरस्कार पुष्पा पोडे पाचभाई  यांनाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी समर्पित केला आहे.

Previous Post Next Post